एसटी प्रवासात ५० टक्के सूट; आमदार अश्विनी जगताप आणि उमा खापरे एसटीने मुंबईला रवाना | Ashwini Jagtap

2023-03-20 8

राज्य सरकारने एसटी प्रवासामध्ये महिलांना तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिल्यानंतर चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप आणि विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड मधील माजी महापौर आणि नगरसेविका यांनी आज अधिवेशनासाठी एसटीने प्रवास केला. यावेळी दोन्ही महिला आमदारांनी कॉलेज आणि शालेय जीवनात एसटी किती महत्वाची होती या आठवणींना उजाळा दिला आहे. अधिक महिला आणि तरुणींनी एसटी ने प्रवास करावा अस आवाहन देखील त्यांनी केलंय. त्यांच्याशी संवाद साधला आहे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी

Videos similaires